Pune : सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे आणि रमेश गलांडे यांची ‘या’ विभागात नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्याबाबतचे आदेश काढला आहे.

नागपूरवरून पुण्यात आलेले सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांची वानवडी विभागाच्या सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चंद्रपूर येथून आलेले रमेश गलांडे यांची खडकी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

काही वेळापूर्वीच खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त लक्ष्मण बोराटे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. तर फरासखाना विभागाचे सहाय्यक आयुक्त मिलिंद पाटील यांची विशेष शाखेत (प्रशासन-1) नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज (शनिवार) काढला आहे.