Pune : पवनानगर येथील सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शननं रंगेहाथ पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पवनानगर येथील जलसिंचन उपसा विभागाच्या सहाय्यक अभियंत्या महिलेला 90 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले आहे.

मोनिका रामदास ननावरे (वय 31) असे पकडण्यात आलेल्या सहाय्यक अभियंत्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. यातील तक्रारदार मावळ तालुक्यातील करूजगावचे आहेत. त्यांची तेथे शेती आहे.या शेताला पवना नदीतून पाणी उपसा करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यावेळी लोकसेवक मोनिका यांनी तक्रारदार याच्याकडे परवानगी देण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार आज सापळा कारवाईत मोनिका यांना तडजोडीअंती 90 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे.