Pune : ‘कोरोना’चा पोलीस दलातील पाचवा बळी ! सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा दुर्दैवी मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहर पोलीस दलातील कोरोनामुळे हा पाचवा बळी गेला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. भगवान रामचंद्र निकम (वय 55) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

भगवान निकम हे पुणे शहर पोलीस दलात विशेष शाखेत नेमणुकीस होते. विश्रांतवाडी पोलीस वसाहतीत राहत होते. त्यांना डायबेटीस व मणक्याच्या त्रास होता. दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निदान 12 सप्टेंबर ला झाले होते. यानंतर लागलीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर त्यांना कमांड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना त्यांचा आज रात्री मृत्यू झाला आहे. गेल्या यिन दिवसापासून त्यांना श्वासनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. टीसनच्या पश्चात पत्नी मूल असा परिवार आहे.