Pune : शहर पोलीस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामूळे मृत्यू, आतापर्यंत 13 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील एका सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामूळे मृत्यू झाला. कर्तव्य निभावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर शहर पोलीस दलात कोरोनाचा 13 वा बळी आहे. यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

संतोष जनार्दन म्हेत्रे (वय 55) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

म्हेत्रे हे कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यांना 5 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर विश्रांतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच म्हेत्रे यांना कावीळ व निमोनियाही असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार उपचार सुरू होते. त्यांची तब्बेत सुधारत होती. पण, अचानक रात्री त्यांची तब्बेत खालावली व त्यांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांनी लसीचा पहिला ढोस घेतला होता. त्यानंतरही त्यांना कोरोनाची लागण झाली. तर यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने पोलीस दलात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा असा परिवार आहे.