वॉकीटॉकी वर ‘तर्रर्र’….सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

गैरवर्तन, बेशिस्त आणि बेजबाबदारपणाला पोलिस दलात अजिबात थारा दिला जात नाही. जो कोणी गैरवर्तन करतो त्याला तात्काळ निलंबीत करण्यात येते. मात्र, सगळे काही माहित असताना देखील काही पोलिस आपल्याच धुंदीत असतात. त्यांची धुंदी निलंबीत झाल्यानंतर उतरते. असाच काहीसा प्रकार बंडगार्डन वाहतूक विभागात घडला आहे. नशेमध्ये राहून वॉकीटॉकीवर अर्वाच्च शिवीगाळ तसेच अपशब्द बोलल्याच्या संशयावरून एका सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकास सेवेतुन निलंबीत करण्यात आले आहे.

‘ते’ 12 पोलिस अधिकारी, कर्मचारी निलंबनातुन मुक्‍त

एस.बी. धांडे असे निलंबीत करण्यात आलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे. दि. 10 सप्टेंबर रोजी धांडे हे बंडगार्डन वाहतुक विभागातील मोरओढा येथे वाहतुकीचे नियमन करीत होते. त्यांच्यासोबत सहाय्यक उपनिरीक्षक शिंदे हे देखील कर्तव्यावर हजर होते. सकाळी 11 वाजता शिंदे यांनी त्यांच्याकडील वॉकीटॉकी धांडे यांच्याकडे सोपविली आणि ते डयुटीचा चार्ज धांडे यांच्याकडे देवुन निघुन गेले. दुपारी 2 वाजता शिंदे हे मोरओढा या ठिकाणी कर्तव्यासाठी आले असता धांडे हे त्या ठिकाणी नव्हते. धांडे हे वॉकीटॉकी घेवुन कुठेतरी गेले असल्यामुळे शिंदे यांनी त्यांना फोन लावला. त्यावेळी धांडे यांनी जेवण करून येतो असे उत्‍तर दिले.[amazon_link asins=’B01DDP83FM,B01DDP7D6W,B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1d1ac16e-b71c-11e8-bb61-0b10f0770be6′]

दरम्यान, दुपारी 2 वाजुन 40 मिनीटांनी धांडे यांनी वॉकीटॉकीवरून अर्वाच्च शिवीगाळ तसेच अपशब्द प्रसारित केले. वॉकीटॉकीवरून प्रसारित झालेले सर्व संभाषण वाहतुक विभागातील प्रभारी अधिकार्‍यांनी ऐकले. धांडे यांनी ते भाष्य नशेमध्ये केल्याचा संशय प्रभारी अधिकार्‍यांना आला. त्यामुळे प्रभारी अधिकार्‍यांनी सहाय्यक उपनिरीक्षक एस.बी. धांडे यांना तात्काळ वाहतुक विभागात हजर राहण्याबाबत सांगितले. मात्र, धांडे यांनी त्यांच्याकडील वॉकीटॉकी परस्पररित्या शिंदे यांना दिली आणि ते निघुन गेले.

सहाय्यक उपनिरीक्षक एस.बी. धांडे यांनी पोलिस दलात राहुन गैरवर्तन आणि बेशिस्तीचे वर्तन केल्यामुळे त्यांना निलंबीत करण्यात आले. त्यांच्या निलंबनाचे आदेश वाहतुक विभागाच्या पोलिस उपायुक्‍त तेजस्वी सातपुते यांनी काढले आहेत.