कौतुकास्पद ! पोलिस हवालदाराची मुलगी वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी बनली ‘न्यायाधीश’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रियांका संजय धुमाळ वयाच्या 24 व्या वर्षी न्यायाधीश झाल्या आहेत. लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या न्यायाधीशाच्या परीक्षेत प्रियांका उत्तीर्ण झाल्या आहेत. प्रियंका या पुण्यातील शिवाजीनगरच्या मॉडर्न कॉलेजशेजारी असलेल्या बी 11 पोलीस वसाहतीत राहतात. शनिवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास या परीक्षेचा निकाल लागला. या परीक्षेत एकूण 15000 उमेदवारांनी सहभाग घेतला होता. एकूण 190 उमेदावारांसाठी व्हॅकेन्सी होती. प्रियांका यांनी यात परीक्षेत 185 वा क्रमांक पटकावला आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी न्यायाधीशाची परीक्ष पास केली आहे.

प्रियांका यांच्याविषयी अधिक माहिती अशी की, वयाच्या 24 व्या वर्षी त्यांनी न्यायाधीशाचाी परीक्षा पास केली. 2017 साली त्या LLB पास झाल्या. यानंतर 2019 मध्ये त्या LLM आणि JMFC या परीक्षा उत्तीर्ण झाल्या. सध्या त्या वकिलाची प्रॅक्टीस करत आहेत. पोलीस हेड क्वॉर्टरच्या लायब्ररीत बसून त्यांनी अभ्यास केला. त्यांना त्यांच्या वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अखेर त्यांनी कठोर परिश्रम घेत यशाचं शिखर गाठलं.

पोलीसनामाशी बोलताना प्रियांका म्हणाल्या, “शनिवारी सायंकाळी 6 वाजात माझा रिजल्ट होता. मी ऑफिसात होते. माझे अ‍ॅड. आनंद बोत्रे यांनी(माझे सीनीयर) माझा रिजल्ट पाहिला. मी परीक्षा पास झाल्याचं ऐकल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी काय करू हेच मला सुचत नव्हतं. माझ्या चेहऱ्यावर फक्त हसू होतं. मी लगेच माझ्या वडिलांना फोन केला. आणि त्यांना ही आनंदाची बातमी दिली. मी पास झाल्याचं ऐकून त्यांनाही खूप आनंद झाला. त्यांना रडूच कोसळलं. मी घरी गेल्यानंतरही तासभर त्यांचे आनंदाश्रू वाहतच होते. माझ्या आई आणि बाबांचा एवढा आनंद पाहून माझा आनंद द्विगुणित झाला.”

पुढे बोलताना प्रियांका म्हणाल्या, “या परीक्षेची तयारी करण्यासाठी मी, बी. ई. आव्हाड हा क्लास जॉईन केला होता. गणेश शिरसाठ हे माझे शिक्षक आहेत. त्याच्या शिकवण्याचा मला खूप फायदा झाला. माझ्या यशात माझे आई-बाबा, माझा क्लास आणि सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.”

पोलिसाची मुलगी एवढे कष्ट घेऊन न्यायाधीश झाली याचा मला पोलीस म्हणून अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया संजय धुमाळ यांनी दिली. संजय धुमाळ Bomb Detection & Disposal Squad (BDDS)मध्ये पोलीस हवालदार आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/