पुणे ATS मधील पोलीस कर्मचारी बापु जांभळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातल्या 54 पोलिसांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या पोलिसांची यादी जाहीर केली आहे. देशातील 1040 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. पुणे दहशतवाद पथकातील पोलीस कर्मचारी प्रदीप उर्फ बापु हरिश्चंद्र जांभळे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाने राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवा दल पदकांची घोषणा केली.

प्रदीप उर्फ बापु जांभळे यांना आत्तापर्यंत 328 बक्षिसे मिळाली असून त्यातून त्यांना 93 हजार 750 रोख रक्कम प्राप्त झाली आहे. अशाचप्रकारे केलेल्या कामगिरी करीता त्यांना 2009 मध्ये पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले होते. त्यांनी केलेल्या अत्यंत महत्वाच्या कामगिरीकरीता जांभळे यांना यंदा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

बापु जांभळे यांची कामगिरी
प्रदिप उर्फ बापु जांभळे यांनी त्यांच्या कार्यकाळात 21 लाख 89 हजार 325 रुपयांची 101 पिस्तुल व 138 जिवंत काडतुसे पकडली आहेत. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, दरोडा, जबरी चोरी, बनावट नोटा तयार करणे, दहशत माजवणे या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पुणे आणि परिसरातून गुन्हेगारांना शोधून संबंधीत पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.

भारतात राहुन पाकिस्तानी आयएसआयकरिता काम करणाऱ्या व दहशतीचा कट रचणाऱ्या 5 बांगलादेशींना जांभळे यांनी पकडले आहे. अंमली विरोधी कारवाई करताना त्यांनी 52 लाख 4 हजार रुपये किंमतीचे 540 ग्रॅम हिरॉईन जप्त करून मोठी करवाई केली. सामाजिक सुरक्षा विभागात काम करत असताना त्यांनी वेश्याव्यवसायात ढकलेल्या अल्पवयीन 70 व सज्ञान 140 मुलींची सुटका करून 80 आरोपींना अटक केली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like