Pune : ATS ची शिरुरमध्ये कारवाई ! गावठी पिस्तुलसह 4 जणांना घेतले ताब्यात

शिक्रापुर : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पदी डॉ.अभिनव देशमुख यांनी पदभार स्वीकारताच पुणे जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी अवैध अग्निशस्त्र विरोधी कारवाई तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार ATS च्या पथकाने शिरूर परिसरात गस्त घालत असताना खबऱ्यां मार्फत मिळालेल्या माहितीनुसार शिरूर पोलीसच्या मदतीने चार सराईत गुंडांना अटक केली असून त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल जप्त केले आहे.अशी माहिती दहशतवाद विरोधी कक्ष पुणे ग्रामीणचे ( ATS ) सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते यांनी दिली.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे पथक शिरूर हद्दीमध्ये गस्त घालत असताना दहशतवाद विरोधी कक्षाच्या पथकाला बातमीदारा द्वारे माहिती मिळाली होती. त्यानुसार दहशतवाद विरोधी कक्ष पथकाने शिरूर पोलिसांच्या मदतीने किरण सोनवणे, सुनील सोनवणे, संतोष मंडले( सर्व रा.राळेगण थेरपा ता.पारनेर जि. अहमदनगर )व हर्षराज शिंदे (रा.बाभुळसर ता.शिरूर जि.पुणे) यांना शिरूर येथून ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत.या चारही आरोपी वर बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगल्या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच मिळालेल्या माहिती नुसार या आरोपींवर यापूर्वी खून ,दरोडा खुनाचा प्रयत्न यासारखे इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.श्री.अभिनव देशमुख,अप्पर पोलीसअधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड गजानन टोम्पे,स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट ,शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते,शिरूर पोलिस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे , सहाय्यक फौजदार विश्वास खरात, पोलीस नाईक विशाल भोरडे ,किरण कुसाळकर, महेंद्र कोरवी, लक्ष्मण राऊत, मोसिन शेख, अरुण पवार, जारवाल यांनी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like