Pune : येरवडयात हातात कोयता अन् तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   हातात कोयता अन तलवारी सारखे हत्यार घेऊन दहशत निर्माण करत एका तरुणाचा पाठलागककरूनर घरात घुसत शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मयूर संजय माचेकर (वय 23, रा. गणेशनगर, वडगाव-शेरी), ओमकार उर्फ डब्या मनोज जगधने (वय 19, रा. यशवंतनगर, येरवडा), पांग्या उर्फ हर्ष गायकवाड (वय 19, रा. हडपसर) या तिघांना अटक केली आहे. तर एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरातील यशवंतनगर येथे (दि. २८ मार्च) रात्री सव्वा दहाच्या सुमारास तसेच (२९ मार्च) दुपारी १२ वाजता फिर्यादी राहत असेलेल्या तेथे आरोपी हातात कोयता व घातक शस्त्र घेऊन शिवीगाळ व आरडा-ओरडा करत आले होते. आरोपी व फिर्यादी यांच्यात पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला मारण्यास फिर्यादीच्या मागे धावत त्यांचा घरात घुसले. त्यांनी फिर्यादींच्या बहिणीला फिर्यादीचे पाय तोडण्याची धमकी दिली. तर, परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.