Pune : वाळुने भरलेला टेम्पो अंगावर घालुन पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न

इंदापूर – कांदलगाव (ता.इंदापूर) येथील कांदलगाव ते तरटगाव रोडवर भांगे वस्तीजवळ उजणी जलाशय पात्रातील अवैध गौण खणीज वाळु टेम्पोत भरून चोरी करून घेवुन जात असताना इंदापूर पोलीसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाळुने भरलेला टेम्पो चालकाने भरधाव वेगाने पोलीसांच्या अंगावर घालुन जीवे मारण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्या बाबतची फीर्याद पो.काँ. विठ्ठल धोंडीराम नलवडे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात दीली असुन, त्यानूसार चार जणांवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याचे इंदापूर पोलीसांनी सांगीतले.

शकील बशिर जमादार (वय २५), रत्नदीप मोतीराम जाधव, योगेश पिंटु काळे सर्व रा.कांदलगाव, ता. इंदापूर,जि. पूणे व जय बबन कांबळे रा. पाथरी, जि.परभणी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवार दिनांक एक मे २०२१ रोजी सायंकाळी ६:१५ वा.चे सुमारास ही घटना घडली असुन आरोपींच्या ताब्यातील अशोक लेलंड टेम्पो, किंमत ७ लाख रूपये व एक ब्रास वाळु किंमत १० हजार असा एकुण ७ लाख १० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहीती पोलीसांनी दीली.

फीर्यादीत म्हटले आहे की आरोपी हे उजणी नदीपात्रातील वाळु ही चोरी करून पांढर्‍या रंगाचा अशोक लेलंड टेम्पोत भरून कांदलगावहुन तरटगावकडे जात असताना भांगे वस्तीजवळ टेम्पो चालकास टेंम्पो थांबविण्याचा इशारा केला.त्यावेळी शकील जमादार याने टेम्पो मालक योगेश कांबळे याचे सांगणेवरून त्याचे ताब्यातील टेम्पों भरधाव वेगाने चालवुन फीर्यादी यांचे अंगावर घातला.व फीर्यादीना जीवे मारण्याचा व शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपींवर फीर्यादींला जीवे मारण्याचा प्रयत्न, गौण खणीज, पर्यावरण संरक्षण, सार्वजणीक मालमत्ता विद्रुपीकरण,मोटार वाहन कायदा, सह आपत्ती व्यवस्थापन कायदा व भारतीय साथ रोग कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.