पुण्यात पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोथरूड भागात पुर्ववैमन्यशातून तरुणावर कोयत्याने वारकरून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. कोथरुड पोलिसांनी जेरबंद केले.

राहूल रामदास सणस (रा. कोथरुड ) याला पकडण्यात आले आहे. याप्रकरणी संदीप कुंबरे (वय ४३, रा. शास्त्रीनगर, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरुडमधील सुतारदरा परिसरात संदीपचे श्री समर्थ मेडीकल आहे. काही दिवसांपुर्वी राहूल आणि संदीप यांच्यामध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्याचा राग मनामध्ये ठेउन काल राहूलने संदीपला शिवीगाळ केली. तुला माज आलाय का, आमच्या खबरी पोलिसांना देता असे म्हणत कोयत्याने वार केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.