पुण्यात पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  बिबवेवाडीत पुर्ववैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीला पोलिसांनी पकडले आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

अमित राकेश साळुंके (वय २८, रा. कोठारी कॉलनी, बिववेवाडी ) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समीर खाटपे (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीरचा भाउ अमित खाटपे याच्याशी साळुंकेची भांडणे झाली होती. त्याचा राग मनामध्ये धरुन दोन दिवसांपुर्वी अमितने समीरला तुझा भाउ कोठे आहे, त्याला जिंवत सोडणार नाही, अशी धमकी देउन शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने समीरला मारहाण करुन शस्त्राने हातावर वार केला. अधिक तपास उपनिरीक्षक डी. बी. काळे करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like