पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तिघांनी कोयत्याने सपासप वार केल्याची घटना पुण्यातील खडकी परिसरात घडली. सर्व पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

शुभम सावंत (वय 22, रा. भालेकरनगर, पिंपळे गुरव) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणावर यापूर्वीचे मारहाणीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर यातील आरोपींचे देखील पोलीस रेकॉर्ड असून, त्यांच्यावर 4 ते 5 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यात एकमेकांकडे पाहण्यावरून वाद आहेत.

रविवारी फिर्याफी मित्रासोबत दुचकीने घरी जात होता. त्यावेळी तिघांनी अडवून त्याला शिवागीळ करत डोक्यात कोयत्याने वार केले. तर हातावर उलट्या कोयत्याने वार करून पसार झाले. अधिक तपास उपनिरीक्षक भोसले हे करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like