Pune : पूर्ववैमनस्यातून चौघांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पूर्ववैमनस्यातून चौघांच्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. चाँद शेख असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी इरफान शेख (वय २४, रा. अप्पर बिबवेवाडी ) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी चाँद आणि त्यांचा भाउ इरफान दुचाकीवर चालले होते. त्यावेळी अप्पर बिबवेवाडीत बोरकर मेडीकलजवळ थांबलेल्या शेखने त्यांना अडविले.

जुन्या भांडणाच्या रागातून शेखने चाँदला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील शस्त्राने चाँदवर वार करुन जखमी केले. अधिक तपास सहायक निरीक्षक पावसे हे तपास करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like