Pune : चहा पिताना एकमेकांकडे पाहण्यावरून तिघांनी तरूणावर केले कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  चहा पिताना एकमेकांकडे पाहण्याच्या रागातून तिघांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याप्रकरणी शुभम ढमाळ (वय २५, रा. वडगाव बुदू्रक) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास शुभम व त्यांचा मित्र दत्ता खारगे चहा पिण्यासाठी कुदळे पाटील कमानीसमोरील टपरीवर गेले होते. त्यावेळी तेथे चहा पित असलेल्या तिघांकडे शुभमने पाहिले. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी शुभमला आणि दत्ताला शिवीगाळ केली. त्यामुळे झालेल्या भांडणातून तिघांनी शुभमवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. अधिक तपास उपनिरीक्षक के. एस. तनपुरे करीत आहेत.