पत्नीच्या प्रेमसंबंधाला केला पतीनं विरोध, प्रियकरानं साथीदारांच्या मदतीनंं केले कोयत्यानं सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पतीने पत्नीच्या प्रेमसंबंधाला विरोध केल्यानंतर पतीला प्रियकर आणि त्याच्या मित्राने बेदम मारहाण करत उलट्या कोयत्याने सपासप वार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बिबवेवाडीत हा प्रकार घडला आहे.

अनिल उर्फ शक्ती शिवशरण (वय २०), नितीन गोपीनाथ फुलारी (वय २०, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर त्यांचा साथीदार बाळू पवार हा पसारा झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी पत्नीसह बिबवेवाडीत राहायला आहे. त्यांच्या परिसरात असलेल्या अनिल उर्फ शक्तीचे फिर्यादी याच्या पत्नीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ही माहिती फिर्यादी यांना समजली. त्याने दोघांच्या प्रेमाला विरोध केला. त्याचा राग आल्याने अनिलने फिर्यादी यांच्याशी वाद घातला. तसेच साथीदारांच्या मदतीने उलट्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. तर नितीन व बाळू याने लोखंडी पट्टीचा धाक दाखवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार शिंदे तपास करीत आहेत.