30 रूपये न दिल्याने भररस्त्यात तरुणावर सुरीने सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दारू पिण्यासाठी 30 न दिल्याने भररस्त्यात तरूणावर सुरीने सपासप वारकरून गंभीर जखमी केल्याची घटना चतुश्रृंगी परिसरात घडली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडला आहे. आझाद आबीद शेख (वय 28, रा. औंध) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात संजय दिलीप घडसिंग (वय 42) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंधमधील कस्तुरबा वसाहतीत दोघेही राहण्यास आहेत. दरम्यान, फिर्यादी आझाद हे जेवण केल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभारले होते. त्यावेळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी तेथे आला.

तसेच, त्याला दारू पिण्यासाठी 30 रुपये मागितले. मात्र, आझाद याने पैसे देण्यास नकार दिला. यावरून आरोपीने वाद घातला. तसेच, या वादातच सुरीने आझाद याच्यावर सपासप वार केले. यात आझात हा जखमी झाला आहे. अधिक तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –