पुणे : पूर्ववैमन्यस्यातुन तरुणावर वार, चौघे अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना समर्थ परिसरात घडली. चौघांना पोलिसांनी अटक केली. दोन दिवसांपुर्वी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास नानापेठेत घडली.

मुनाफ रियाज पठाण (वय २३), अक्षय लक्ष्मण शितोळे (वय २४), हितेंद्र विजय यादव (वय ३२), अक्षय दशरथ अकोलकर (वय २८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आकाश सासवडे (वय २०, रा. गणेशपेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश यांची काही दिवसांपुर्वी ओंकार साळुंखे आणि ललीत ससाणे यांच्याशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या रागातून मुनाफ, अक्षय, हितेंद्र, अक्षय अकोलकर यांनी मिळून आकाशवर कोयत्याने वार करुन जखमी केले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिखलगार हे करीत आहेत.