पुण्यात सुट्या पैशांवरून दुकानदारावर कोयत्यानं सपासप वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – येरवडा परिसरात दुकानदाराकडून सिगारेट घेतल्यानंतर 500 ची नोट दिल्यानंतर त्यांनी सुट्टे पैशे मागितल्यावरून झालेल्या वादात एकाने कोयत्याने वारकरून महिलेला दगडाने मारहाण केल्याची घटना घडली.

याप्रकरणी हिम्मतराव कुमावत (वय 35) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुमावत हे लक्ष्मीनगर येथे राहण्यास असून, त्यांचे महालक्ष्मी प्रोव्हिजन स्टोअर्स या नावाचे किराणा दुकान आहे. दरम्यान, आरोपी दुकानात आला. त्याने 500 रुपयांची नोट दिली. तसेच, सिगारेट मागितली यावेळी फिर्यादींनी सिगारेट दिली, तर, त्यासोबतच 500 ची नोट परतकरून सुट्टे पैसे मागितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी त्याने कंबरेला लावलेला कोयता काढून त्यांच्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. यात त्यांच्या हाताला गंभीर मार लागला. यावेळी त्यांच्या पत्नीमध्ये आली असता त्यांना दगडाने मारहाण करण्यात आली. गोंधळ झाल्याने नागरिक जमा होताच आरोपी तेथून पसार झाला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

उपचारासाठी हिम्मतराव यांना रुग्णालयात दाखलकरून पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली. त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपीचा शोध लागलेला नाही. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.