पुण्यात भांडण सोडविणार्‍या तरूणावर वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – भांडण सोडविण्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने वार करुन 22 हजारांची रोकड चोरल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. पोलिसांनी चौघांना अटक केली.
सुखदेव दत्ता नळेकर (वय 24), सुरज पांडुरंग खंडागळे (वय 25), किरण नवनाथ रणदिवे (वय 23) आणि दीपक तानाजी देवकुळे (वय 18, सर्व रा. कोंढवा रस्ता) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

ही घटना मंगळवारी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील इंद्रिरानगरमध्ये घडली.
याप्रकरणी मंगेश शिगवण वय 42, रा. इंद्रिरानगर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश आणि त्यांचा मित्र श्याम व विजय यांच्यासह शेळके वस्ती परिसरातून जात होते. त्यावेळी सुखदेव, सुरज, किरण, दीपक मिळून माणतेस दंडणकर यांना मारहाण करीत असल्याचे मंगेशने पाहिले. त्यामुळे मंगेशने त्याठिकाणी जाउन त्यांची भांडणे सोडविली. त्याचा राग आल्यामुळे चौघांच्या टोळक्याने मंगेशला तु नेहमीच गल्लीतील लोवैांची मदत करतो, पुढारपण करतो असे म्हणत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने वार करुन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक आर. सी. उसगावकर अधिक तपास करीत आहेत.