जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गंजपेठेत किरकोळ कारणातून भावाला मारहाण करणार्‍यांना जाब विचारण्यास गेलेल्या तरुणांना पाच जणांनी मारहाण करुन चॉपरने वार केल्याची घटना घडली.
याप्रकरणी साद सुंडके (वय 18, रा. गंजपेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 5 जणांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणामुळे साद यांचा भाउ यासिर आणि मित्र अदनान शेखला परिसरातील तरुणांनी मारहाण केली होती. त्यामुळे काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास साद त्यांच्याकडे जाब विचारण्यासाठी गेला होता. त्याचा राग आल्यामुळे पाच जणांनी साद यांना तुम लोक इधरके भाई बन गये हो, तुम्हारा खेल खत्म करना पडेगा असे म्हणत चॉपरने वार केला. आरोपींनी साद यांच्या दंडावर आणि मानेवर वार करुन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी अधिक तपास करीत आहेत.