पुण्यात मध्यरात्री कुविख्यात गुन्हेगाराकडून युवकावर सपासप वार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातून तडीपार करण्यात आलेला तसेच कुविख्यात गुन्हेगाराने मध्यरात्री टपरीवर एका महिलेला धक्का लागल्यावरून तीन तरुणांवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तत्पुर्वी बुधवार पेठेतील रात्रीचे भयावह चित्र आणि तेथील उद्दामपणा काही केल्या कमी होत नसल्याचेही दिसत आहे.

याप्रकरणी प्रमोद महाजन व एका महिलेसह दोघांवर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश घोलप (वय 25, रा. रामटेकडी) व चुलत भाऊ सोनु उर्फ अरविंद घोलप व मित्र आकाश मोरे हे तिघे जखमी झाले आहेत. यात आकाश घोलप याची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश घोलप हा खासगी कंपनीत नोकरी करतो. रात्री बुधवार पेठेतील क्रांती चौकात सिगारेट पिण्यासाठी आले होते. पान स्टॉलवरून सिगारटे घेत असताना याठिकाणी उभी असलेल्या एका महिलेला आकाश याचा धक्का लागला. यावेळी महिलेने वाद घातला. त्यावेळी प्रमोद महाजन तेथे आला. त्यासोबत आणखी एकजण होता. तिघांनी आकाश याच्याशी वाद घालून त्याला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे चुलत भाऊ अरविंद व मित्राने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या गळ्यावर आणि डोक्यात सपासप वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. काही नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर फरासखाना पोलीसांनी याठिकाणी धाव घेतली. अधिक तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

दरम्यान, बुधवार पेठेत मध्यरात्री चांगलीच गर्दी पाहयला मिळते. येथील चहाचे स्टॉल आणि पान स्टॉल उघडे असतात. त्याठिकाणी मोठी गर्दी आणि टवाळखोरांचा गोंधळ असल्याचे चित्र सतत सुरू असते. पोलिसांची गाडी आल्यानंतर तेवढ्या पुरते सर्वजन शांत होतात. मात्र पोलिस गेल्यानंतर पुन्हा तोच गोंधळ सुरू होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/