Pune : 2 अल्पवयीन पुतणे अन् भावाकडून बेदम मारहाण, बोपोडीत खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारी राहणाऱ्या दोन सख्या भावांमध्ये सतत किरकोळ कारणावरून वाद होत; पण, सोमवारी दोन अल्पवयीन पुतणे आणि भावाने बेदम मारहाण करत खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पाठलाग करून डोक्यात पाईप घातल्यानंतर वहिनीवर देखील वार करण्यात आले आहेत.

याप्रकरणी रेखा संजय बन्सल (वय 30) व त्यांचे पती संजय (वय 33) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात दोन अल्पवयीन पुतणे व त्यांचे वडिलांवर खुनाच्या प्रयत्नासह इतर कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बोपोडीत राहतात. त्यांच्या शेजारीच त्यांचा दिर राहतो. दरम्यान त्यांच्यात सतत किरकोळ कारणावरून वाद होत असत. सोमवारी दुपारी फिर्यादी व त्यांचे पती पायी चालत जात होते. यावेळी तिघेजण हातात लोखंडी पाईप हातात घेत त्यांच्या समोरे आले आणि त्यांनी यांना अडविले. तसेच, शिवीगाळ करत आज तुमको खल्लास कर, डालुंगा असे म्हणून त्यांचा पाठलाग सुरू केला. यानंतर एकाने त्यांच्या पतीच्या डोक्यात वार केला. यात पती खाली कोसळले. तर ते बेशुद्ध पडले. त्यानंतर फिर्यादी यांच्यावर देखील वार करत त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास खडकी पोलिस करत आहेत.