Pune : विरोधकासोबत फिरणार्‍यावर टोळक्याकडून कोयत्याने सपासप वार, लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  विरोधक असलेल्या तरुणाबरोबर फिरत असल्याच्या खुन्नसवरून एकावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे.

याप्रकरणी आशिष बाळासाहेब उंद्रे (वय 24) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार सौरभ नेटके उर्फ मल्या याच्यासह तिघांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष हा मांजरी खुर्द परिसरात राहतो. तर आरोपीही त्याच परिसरातील आहेत. ते एकमेकांना ओळखतात. दरम्यान शनिवारी आशिष हा क्रिकेट खेळून घरी जात होता. त्यावेळी त्याला आरोपींनी अडविले. तसेच, त्याला कोयता दाखवत, तू विकास सोनवणे बरोबर फिरतो, तुला मस्ती आली का असे म्हणत उलट्या कोयत्याने वार केले. तर इतरांनी तुला खल्लास करतो असे म्हणत डोक्यात वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.