पुण्यातील नर्‍हेमध्ये तरूणावर खुनी हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   नर्‍हेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादानंतर बदला घेण्यासाठी तरुणावर जीवे घेणा हल्ला केल्याची घटना घडली. यात एकतरूण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

पीयूष उर्फ सनी संजय मोरे (वय 22, रा. दत्तनगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचे पाच साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी सुजीत धाकडे (वय 23, रा. कात्रज) याने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धाकडे व आरोपी ओळखीतील आहेत. या आरोपींनी काही दिवसांपुर्वी अक्षय शिंदे याला मारहाण केली होती. दरम्यान, धाकडे व त्याचे चार मित्र नर्‍हे येथील जेएसपीएम महाविद्यालयाजवळील हॉटेलात बसला होते. त्यावेळी फिर्यादींच्या ओळखीतील शिंदे याला मारहाण केलेले आरोपी तेथे आले. त्यांनी अक्षय व फिर्यादींना शिवीगाळकरून वाद घातला. तसेच, त्यानंतर फिर्यादीला विटांनी मारहाणकरून त्याच्यावर कोयत्याने वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या याप्रकारामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता. आरोपी गोंधळानंतर पसार झाले. माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली. पसार झालेल्या मोरे याला पकडले. त्याचे साथीदारांचा शोध घेतला जात आहे.