पुण्यात किरकोळ वादातून धारदार हत्यारानं सपासप वार, परिसरात खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – हॉटेलात मित्रांसोबत दालचा राईस खाल्यानंतर हात धुताना पाणी अंगावर उडून आल्याच्या झालेल्या वादातून एकावर धारधार हत्याराने सपासप वार करण्यात आल्याचा प्रकार स्वारगेट परिसरात घडला. याप्रकरणी एकाला पोलीसांनी अटक केली आहे.

शब्बीर सलामत शेख (वय 47, रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याघटनेत रजत उर्फ धर्मा किशोर बाभुळकर (वय 24, रा. गुलटेकडी) हे गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मिनातीई ठाकरे वसाहत येथील त्यांच्या एका मित्राच्या रिक्षात बसले होते. यावेळी त्यांच्या काही मित्रांनी त्यांना दालच्या राईस खाण्यास बोलाविले. त्यामुळे ते मित्रांसोबात हॉटेलात गेले. राईस खात असताना शब्बीर शेख त्याठिकाणी आला. फिर्यादीला खेटून बसून हात धुवू लागला.

यावेळी पाणी फिर्यादींच्या अंगावर पाणी पडले. यावरून त्यांच्यात वाद झाले. या वादातून आरोपीने प्रथम मारहाण केली. त्यानंतर बाहेर आल्यानंतर धारधार शस्त्राने त्याच्यावर वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/