Pune : येरवडयात दोघांकडून तरूणावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घराजवळील चौकात थांबण्यावरून तसेच खुन्नस देत असल्यावरून झालेल्या वादानंतर दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.

ऋषिकेश पिसे व फरदीन फय्याज अन्सारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वसीम खुर्शीद शहा (वय 32) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ मोहसीन आणि त्याचा मित्र आकाश काळोखे हे दोन दिवसांपूर्वी रात्री सव्वा आकरा वाजण्याच्या सुमारास चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी चौकात थांबण्यावरून व खुन्नस देण्यावरून त्यांचे सागर हनुमंते याच्याशी भांडण झाले होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. तसेच, रात्री सागर हनुमंते याच्यासोबत असणाऱ्या या दोघांनी हातात कोयते घेऊन आर के चौकात दहशत पसरली. तर पिसे याने फिर्यादीच्या भावाला ‘तू आमच्या अप्पाला खुन्नस देतो काय’ असं बोलून कपाळावर कोयत्याचा वार केला. तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.