पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पैशाच्या वादातून दाम्प्त्यावर कोयत्यानं सपासप वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आर्थिक वादविवादातून दाम्पत्यावर कोयत्याने सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दुचाकीवर टोळके आले होते. सिंहगड रस्ता येथील सई हेरिटेजसमोर घडली आहे.

या घटनेत माधुरी सांगळे (वय 31, रा. सिंहगड रोड) व त्यांचे पती सागर सांगळे (वय 35) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांविरोधात दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी यांच्या सासूने सख्या बहिणीकडून पैसे उसने घेतले होते. त्यावरुन दोन्ही बहिणीमध्ये आर्थिंक वाद होता. चार महिन्यांपुर्वी फिर्यादींची सासू व मावस सासू यांच्यात आर्थिक व्यावहारातून वाद झाले होते. त्याचा राग मनात होता.

दरम्यान, फिर्यादी या काही नातेवाईकांशी इमारतीच्या खाली गप्पा मारत बसल्या होत्या. यावेळी सागर यांचा मावसभाऊ नागेश दळवी तिघा साथीदारांसह आला. त्याने सागर फोनवर बोलत असतानाा डोक्यात शस्त्राने वार केला. साथीदारांनी माधुरीवर यांच्यावर वार केले. यात दोघेह गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक एम.एस. अभंग हे करीत आहेत.