Pune : चौघा सराईतांकडून तरूणावर सपासप वार करून खूनाचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – किरकोळ कारणावरून चार सराईत गुन्हेगारांनी एका तरुणावर सपासप वारकरून खून (murder) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना औंधमधील कस्तुरबा वसाहतीत घडली. ऋषभ उर्फ गुड्डया सुनील गायकवाड (वय 19), अमिर उल्लाउद्दीन शेख (वय 23), अक्षय अर्जुन अडागळे (वय 19), संकेत उर्फ अभिषेक अरुण आवळे (वय 19) अशी अटक.(Arrest) केलेल्या सराईतांची नावे आहेत. यात आकाश गायकवाड असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गा नागनाथ गायकवाड (वय ३९,रा. इंदिरा वसाहत, औंध) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कुटूंबियासह इंद्रिरा वसाहतीत राहायला आहे. ४ ऑक्टोबरला त्यांच्या परिसरात किरकोळ कारणांवरुन लहान मुलांची भांडणे सुरु होती. आकाशने मुलांची भांडणे सोडविली होती. त्याचा राग आल्यामुळे दोन दिवसांपुर्वी गुड्ड्याने आकाशला अडविले. भांडणात तू मध्यस्थी करतो, खूप मोठा भाई झाला का, आता तुला संपवून टाकतो असे म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार केले. त्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्यामुळे आकाशला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अधिक तपास चतुःशृंगी पोलिस तपास करीत आहेत.