Pune : पुर्ववैमनस्यातून चौघांकडून एकावर खुनी हल्ला

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पंधरा दिवसांपूर्वी मुलांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसन मोठ्या भांडणात झाले असून, चौघांनी एकावर खुनी हल्ला करत इतरांना मारहाणकरून तुफान गोंधळ घातला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

याप्रकरणी सलीम मुनीर शेख (वय 48), अजीम सलीम शेख (वय 21) व अदनाम सलीम शेख (वय 19, रा. लोहियानगर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. याबाबत 38 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व फिर्यादी एकमेकांचे शेजारी आहेत. काही दिवसांपूर्वी लहान मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले होते. त्यावेळी हे भांडण मिटले होते. पण आरोपींच्या मनात याचा राग होता. दरम्यान काल फिर्यादी यांचा पुतण्या मोईस शेख हा दुकानात बसला असता अल्पवयीन मुलाने त्याच्याशी वाद घातला व त्याचे भांडण सुरू झाले. त्याला मारहाण होत असल्याने फिर्यादी यांचे पती मूस्ताक शेख हे भांडण सोडविण्यास गेले. पण आरोपींनी कोयत्याने व तीक्ष्ण हत्याराने फिर्यादी यांचे पती व पुतण्यावर सपासप वारकरून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. वस्तीत झालेला गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिक तपास खडक पोलीस करत आहेत.