Pune : कोंढव्यात तरूणावर जम्बो ब्लेडने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पवित्र रमजान महिना सुरू असल्याने मित्राला नशा करू नको असे समजावून सांगत असताना त्याने रागातून जम्बो ब्लेडने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे.

याप्रकरणी नदीम अब्दुल सनद शेख (वय 25) याला अटक केली आहे. यात बिलाल शेख (वय 28) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिना सुरू आहे. यादरम्यान फिर्यादी व आरोपी हे एकमेकांना ओळखतात. नदीम याला नशा करण्याची सवय आहे. दरम्यान फिर्यादी बिलाल व त्याचा मित्र हे जात असताना त्यांना त्यांच्या ओळखितील नदीम हा दिसला. त्यामुळे त्यांनी त्याला अरे रमजान महिना सुरू आहे. तू नशा नकोस करू असे सांगितले. मात्र याचा राग त्याला आला. त्याने खिशातून जम्बो ब्लेड कटर काढले आणि फिर्यादी तरुणाच्या मानेवर सपासप वार करत त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तेथून पसार झाला अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.