Pune ; जाब विचारण्यास गेलेल्या तरूणावर तिघांकडून कोयत्याने सपासप वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – जेष्ठ महिलेला नारळाची कवटी फेकून मारल्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या तरुणावर तिघांनी कोयत्याने डोक्यात वारकरून गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अभिषेक जगताप (वय 19. रा. वारजे) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी निखिल दत्तात्रय चव्हाण (वय 19) आणि ओंकार चंद्रकांत वाघमारे (वय 19) या दोघांना अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा त्याचा मित्र आकाश याच्या घरी सत्यनारायणची पूजा असल्याने घरी जात होते. त्यावेळी मानलेली आजी वाटेत दिसली असता तिच्या चेहऱ्यावर काही तरी लागल्याचे दिसले. त्यामुळे त्याने विचारले असता आजीने मुलानी नारळाची कवटी फेकून मारली असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी तरुण हा मुलांना का कवटी फेकून मारली असे विचारले. त्यावेळी त्याने साईनाथ चौकात भेटण्यास बोलावले. तरुण भेटण्यास गेला असता त्याला तिघांनी शिवीगाळ करत मारहाणकरून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यात तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास वारजे माळवाडी पोलीस करत आहेत.