पुणे : किरकोळ कारणातून तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑलनाईन – हडपसर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी प्रथमेश घाडगे (वय.19,रा. घुले वस्ती मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींसोबत असणार्‍याने आदमाने व काही तरूण शिवीगाळ करत होते. त्यावेळी आरोपी व फिर्यादीत बाचाबाची झाली. आरोपींनी फिर्यादींना तुला काय लय माज आला होता का असे म्हणत त्यांच्याकडील कोयते काढून फिर्यादीयांच्या मोटारसायकलची तोडफोड केली. तसेच कोयत्याने फिर्यादींच्या डाव्या हाताच्या पोटरीवर वार करून दुखापत केली. अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.

सलग दुसर्‍यादिवशी घटना; स्वारगेट स्थानकात महिलेची पर्स हिसकावली
स्वारगेट बस स्थानकांत चोरट्यांचा वावर वाढला असून, सलग दुसर्‍या दिवशी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेजवळील किंमती ऐवज असणारी पर्स चोरून नेली. याप्रकरणी लोहगाव येथील एका 45 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या स्वारगेट बस स्थानकात जेजूरी ते नालासोपारा या बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्यावेळी असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळील पर्सची चैन उघडून त्यातील छोट्या पर्समधील 92 हजाराचे दागिणे व छोटी पर्स चारून नेली.

Loading...
You might also like