पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पुर्ववैमनस्यातून तिघांवर कोयत्याने सपासप वार

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पुर्ववैमन्यासातून सहा जणांच्या टोळक्याने तीन तरुणांवर कोयत्याने सपासप वार केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली. पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. यात एका अल्पवयीन मुलासह तिघे जखमी झाले आहेत.

दत्ता उर्फ राजेश भास्कर इंगळे (वय 19), अनिकेत चंद्रकांत जंगम (वय 19), नीकेत सुनील हातुरे (वय 19), अजिंक्य सुनील खडके (वय 22), प्रथमेश चांगदेव झंवर (वय 22) व अनिकेत विनायक जाधव (वय 19, सर्व रा. धायरी)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ओंकार वसंत सुतार (वय 19), करण रवी पटेकर (वय 17) व फैजल काझी (वय 20 रा. नर्‍हे) हे जखमी झाले आहेत. याबाबत फैजल काझी यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजल आणि दत्ता उर्फ राजेशची चार दिवसांपुर्वी भांडणे झाली होती. त्यामुळे त्याचा राग आरोपीच्या मनात होता. दोन दिवसांपुर्वी रात्री नउच्या सुमारास फैजल, ओंकार आणि करण व्यंकटेश हाईटस इमारतीखाली गप्पा मारत बसले होते. त्यावेळी दत्ता पाच साथीदारांसह त्याठिकाणी हातात कोयते व लाकडी काठ्या घेऊन आला. त्याने फैजलला बांबूने मारहाण करीत कोयत्याने वार केले. तर, साथीदारांनी ओंकारवर कोयत्याने वार करुन जखमीकरून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक चेतन थोरबोले करत आहेत.