वडगाव ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सिहंगड भागातील वडगाव ब्रिजवरून एकाने खाली उडीमारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

किरण कमलाकर क्षीरसागर (वय 35, धायरी) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सिहंगड रोड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण धायरी परिसरात राहण्यास आहे. दरम्यान आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याने वडगाव ब्रिजवर आल्यानंतर त्याने वरून उडी मारली. ही माहिती मिळताच सिहंगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. त्याने उडी का मारली हे समजू शकले नाही. अधिक तपास सिहंगड रोड पोलीस करत आहेत.