पुणे : सावधान! वाहतुकीचे नियम मोडल्यास येऊ शकता अडचणीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरातील वाहतुक सुरळीत चालावी आणि येणाऱ्या सण उत्सवामध्ये वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी पुणे वाहतुक शाखेकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहीमेअंतर्गत ज्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांची माहिती पासपोर्ट, चारित्र पडताळणी तसेच इतर शासकिय कार्यालयांना देण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर शासकीय कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.
[amazon_link asins=’B06Y63B51W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c83d5fb0-a62b-11e8-a644-1549c3cc8e18′]

वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. वाहनचालकांना शिस्त लागावी आणि अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतुक शाखेच्या वतीने वेगवेगळ्या मोहीम राबविण्यात येतात. येत्या रविवारी (दि.२६) रक्षाबंधन असून या दिवसापासून वाहतुक विभागातील महत्वाच्या रस्त्यांवर ‘No Traffic Rule Violation Zone’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर करवाई करण्यात येणार आहे. व्हायोलेशन झोनसाठी पुण्यातील ६६ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील निवड करण्यात आललेल्या ठिकाणांवर आळी-पाळीने कोणत्याही वेळेस कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी अतिरीक्त पोलीसांचा फौज फाटा तैनात करण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B073JYVKNX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cdb42649-a62b-11e8-b344-53665fd3791c’]

या कारवाईत वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच या कारवाईची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी, पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी कार्यालयांना देण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाई झालेल्या वाहनचालकांना पासपोर्ट, चारित्र्य पडताळणी तसेच इतर शासकीय कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. तरी वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम तंतोतंत पाळून वाहतुक पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन वाहतुक शाखेकडून करण्यात आले आहे.