रिक्षाची कागदपत्र नाहीत म्हणून पोलिसांनी फाडली पावती, त्यानंतर झटक्यात झाला चालकाचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वाहतूक नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्यानंतर आणि वाहतूक दंड वाढवल्यानंतर सामान्य माणसाने याचा फार धसका घेतला आहे. या खिसेकापू दंडापासून सुटका मिळावी म्हणून सामान्य माणूस प्रत्येक नियमांचे पालन करताना दिसून येत आहे. मात्र याच नियमांमुळे आणि त्याच्यावरील दंडामुळे एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तरप्रदेशमधील जौनपूर येथे हा प्रकार घडला आहे.

या रिक्षाचालकाला वाहतूक पोलिसांनी 35 हजार रुपये दंडाची पावती फाडल्याने  त्याला धक्का बसला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. रिक्षा चालवत असताना त्याला हा ३५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आलाआणि त्यानंतर 23 दिवसांनी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

31 ऑगस्ट रोजी रिक्षा चालक गणेश अग्रहरी यांना पोलिसांनी रिक्षाचे कागदपत्र नसल्यामुळे 18 हजार 500  रुपयांचा दंड केला. त्यानंतर 23 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. महिला अधिकारी स्मिता वर्मा यांनी त्यांना इतका दंड केला होता. त्यामुळे गणेश यांच्या कुटुंबीयांनी वर्मा यांना त्यांच्या मृत्यूला जबाबदार ठरवले  आहे.

त्यांच्या दरम्यान, या प्रकरणात कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी स्मिता वर्मा यांनी  काहीही बोलण्यास नकार दिला आहे. तसेच कुटुंबीयांनी मात्र त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Visit : policenama.com