Pune : कोरोनाबाधितांना वैद्यकीय उपचाराबरोबर आयुर्वेद काढ्याचीमात्रा लाभदायी – रवींद्र झांबरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मागिल वर्षी कोरोना Corona महामारीमध्ये होळकरवाडी (ता. हवेली) गाव आणि परिसरात अनेक गरीब कुटुंबांना धान्यरूपी मदत केली आहे. सरपंचपदावर असताना ग्रामविकासाच्या योजना आखून त्या राबविल्या आहेत. गावच्या विकासकामांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. कानिफनाथ घाटाचे काम, होळकरवाडी डोंगरांवर धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हजारो वृक्षांची लागवड व संवर्धनामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. तसेच २०१२ साली त्यांनी दीर्घ मुदत कर्ज परतफेड न करु शकलेल्यांना वनटाईम सेंटलमेंट योजनेचा सरकार दरबारी पाठपुरावा केला. हडपसर महंमदवाडी पाणी योजनेतील शेतकऱ्यांचे सुमारे १०० कोटींचे कर्ज माफ करुन घेण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. समाजसेवा ही दिसण्यात नाही, तर रक्तात असावी लागते. सरपंचपदी असताना गावच्या विकासात अनेक नव्या योजना राबवून ते पायलट प्रोजेक्टचे मानकरी आहेत होळकरवाडी (ता. हवेली) चे माजी सरपंच रवींद्र झांबरे..

सुप्रिया सुळेंचे मोठ विधान, म्हणाल्या – ‘जातीपातीचे राजकारण मला महाराष्ट्रात नाही तर दिल्लीत कळालं’

झांबरे म्हणाले की, कोरोना Corona महामारीवर वैद्यकीय उपचाराबरोबर आयुर्वेद काढा प्रभावी ठरत आहे. आयुर्वेदीक काढ्यामुळे १५/१६ सिटीस्कोर व ऑक्सिजन पातळी ६५ पर्यंत खालावलेले रुग्णाला चांगला फायदा होऊन ते बरे होण्यास मदत होत आहे. कोरोनाविरोधातच्या लढ्यात राज्यातील डॉक्टर्स जीवाची बाजी लावत आहेत. आतापर्यंत आयुर्वेदीय पद्धतीने सुमारे एक हजारहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. पॅरासिटेमॉल गोळ्यांसोबत गुळवेल, शतावरी, अश्वगंधा, कोरफड अशा १६ औषधी वनस्पतींच्या काढा होळकरवाडीचे माजी सरपंच रवींद्र झांबरे यांनी सांगितले.

होळकरवाडी, शेवाळवाडी, उरुळी देवाची, वडकी, फुरसुंगी, वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, हडपसर, मांजरी, पुणे शहर, दौंड, नाशिक आदी परिसरातील कोरोनाबाधितांनी पॅरासिटेमॉल गोळ्यांसोबत गुळवेल, शतावरी, अश्वगंधा, कोरफड अशा १६ औषधी वनस्पतींपासून बनविलेल्या काढ्याची मात्रा उपयोगी ठरली आहे. काढ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्याबरोबरच रुग्णांचा रक्तदाब व शुगर नियंत्रित होणे, पोट साफ होण्यास मोठी मदत होत आहे. सीटी स्कोअर १६ असलेल्या रुग्णांवरही यशस्वी उपचार केले आहेत. ८७ वर्षाच्या वृद्धापासून १३ वर्षाच्या वयोगटातील, १६ सीटी स्कोअर असलेले, ऑक्सिजन पातळी ६५ पर्यंत खाली आलेले रुग्णांना काढा लाभदायी ठरला आहे. प्राणायामासाठी प्रोत्साहित करणे, मानसिक आधार देण्याचेकाम दररोज २०-२५ रुग्णांना घरी जाऊन किंवा वेळप्रसंगी दवाखान्यात जाऊनही ते काढा देत आहेत. आतापर्यंत इंजिनिअर, डॉक्टर्स, उद्योजक, पत्रकार, शिक्षक, सरकारी कर्मचारी, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी वैद्यकीय उपचाराबरोबरच औषधी वनस्पतींपासून बनविलेल्या काढ्याचा लाभ घेतला आहे.

मंतरवाडी (ता. हवेली) येथील शरद भाडळे म्हणाले की, कोरोनाबाधित माझ्या आईचा सिटी स्कोअर १६, लहान भाऊ व भावजय यांचाही स्कोअर १० आणि ७ होता. आईला दोन पायऱ्या चढ-उतार केल्यावर धाप लागत होती. मात्र, झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी घरीच उपचार घेतले. दिवसातून चार वेळा आयुर्वेदिक काढा, प्राणायम, विविध आसने, डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या, वाफ यांच्या मदतीने सर्वांना आठ-दहा दिवसांतच ठणठणीत कोरोनामुक्त झाले आहेत. आता माझी आई तीन मजले पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन पायऱ्या असल्याचा अनुभव त्यांनी सांगितले.

हांडेवाडी (ता. हवेली) येथील राहुल हांडे म्हणाले की, माझे कुटुंब कोरोनाबाधित झाले होते. आॉक्सिजन पातळी ७० पर्यंत गेल्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये १७ दिवस ऑक्सिजनवर होतो. घरी आल्यावरही ऑक्सिजनची सोय करावी लागली. ऑक्सिजन काढला की, दम लागत होता. मात्र, मात्र, घरातील सर्वांनी झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली घरीच उपचार घेतले. त्यानंतर मीही त्यांच्या म्हणण्यानुसार आयुर्वेदीय उपचार केल्यामुळे आठवड्यातच ठणठणीत बरे झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रवींद्र झांबरे यांनी सांगितले की, साथीच्या आजाराप्रमाणे कोरोना १०० टक्के बरा होऊ शकतो. उपचाराबरोबर आधारही महत्त्वाचा आहे. कोरोनाच नव्हे, तर इतर कोणत्याही आजाराची लक्षणे दिसू लागली की तातडीने उपचार करून घेणे स्वतःबरोबर इतरांसाठी महत्त्वाचे आहे. योग्य दिनचर्या, सकस आहार, नियमित व्यायाम व तणावमुक्त जीवन ही चतृसुत्री अंमलात आणल्यास कोरोनाविरोधातचा आपला लढा यशस्वी होईल. सामाजिक आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून कोरोना महामारीवर आयुर्वेदीक काढ्याच्या माध्यमातून उपचार करण्याची संधी मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

Also Read This : 

दिलासादायक बातमी ! कोरोनाच्या केस होताहेत कमी, 12 आठवड्यानंतर मृत्यूंचे आकडेसुद्धा घसरले

‘या’ वयात सर्वात जास्त मिळतो शरीरसुखाचा आनंद, जाणून घ्या कालावधी

‘प्रेमा’ला विरोध झाल्याने चुलत बहिण-भावाने केली ‘आत्महत्या’

Pune : भरधाव दुचाकीनं रस्ता क्रॉस करणार्‍या 7 वर्षाच्या सियाला उडवलं; चिमुरडी गंभीर जखमी