Pune : गुण वाढविलेल्या मुल्यांकन प्रमुखास जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निगमधील १७८ विद्यार्थ्यांचे पैसे घेऊन गुणवाढ करणाऱ्या मुल्यांकन प्रमुखाची न्यायालयाने जामीन मंजूर केला संदीप रामकृष्ण हेंगले असे त्याचे नाव आहे . सायबर पोलिसांनी त्याचा साथीदार सुमित मुरारीलाल अग्रवाल (वय ३५, रा. अलवर, राजस्थान) याला मंगळवारी अटक केली आहे न्यायालयाने त्याला २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस मुजुमदार यांनी संदीप हेंगले याची २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. आरोपीने दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या  रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावावी,असे आदेशात म्हटले आहे . हेंगले याच्यावतीने अ‍ॅड पुष्कर दुर्गे यांनी काम पाहिले .