Pune Balgandharva Rangmandir | बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यावर अखेर शिक्कामोर्तब; कलाकारांनी दर्शविला विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Balgandharva Rangmandir | पुणे शहरातील बालगंधर्व रंगमंदिर (Pune Balgandharva Rangmandir) हे अग्रगण्य नाट्यगृह आहे. या नाट्यगृहाचे उद्‌घाटन 26 जून 1968 रोजी झाले. या नाट्यगृहाची मालकी सार्वजनिक असून त्याची व्यवस्था पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) पाहते. नुकतंच 2018 साली तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाची संकल्पना मांडली आणि अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद देखील केली होती. त्यानंतर कोरोनाच्या महामारीत हा विषय तसाच प्रलंबित राहिला. त्यावेळी काहींनी रंगमंदिर पाडण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे पुनर्विकासासाठी महापालिका स्तरावर समिती स्थापन केली. मात्र आता बालगंधर्व पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.

 

बालगंधर्व पाडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून याला कलाकारांकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे. दरम्यान, कलाकार आणि सामान्य नागरिक म्हणत आहेत की, 2018 साली जेव्हापासून हा प्रस्ताव मांडण्यात आलाय, तेव्हापासून आम्ही याला विरोध करतोय. राजकारणी मंडळी हे राजकीय स्वार्थासाठी एकत्र आले आहे. मात्र, आम्ही याला विरोध करणार आहोच. आज पुणे शहरात एकूण 14 नाट्यगृह असून शहरात केवळ तीन नाट्यगृहच सुरू आहे. तर काही श्रेयवादावरून राजकारण सुरू असल्याने नाट्यगृह बंद आहे. असाच प्रकार या बालगंधर्व नाट्यगृह मंदिराबाबत होणार आहे आणि अजूनही यासारखी वास्तू कुठेही नाही. त्यामुळे ही वास्तू पाडली जाऊ नये. (Pune Balgandharva Rangmandir)

दरम्यान, आताचे बालगंधर्व रंगमंदिर 22.5 हजार चौरस फूट जागेवर असून मूळ वास्तू पाडून 3.5 लाख चौरस फुटांचे रंगमंदिर बांधले जाणार आहे. या दरम्यान, नवीन वास्तुमध्ये आठशे ते नऊशे टूव्हिलर (Twowheeler) आणि साडेतीनशे फोरव्हिलर (Fourwheeler) वाहनांची पार्किंग व्यवस्था असेल. 1000, 500 आणि 300 अशा आसनक्षमतेची तीन नाट्यगृहे असणार आहे.

 

 

Web Title :- Pune Balgandharva Rangmandir | decision to demolish balgandharva rangmandir in pune opposition from artists pune news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा