Pune Band | ‘पुणे बंद’ला पुणेकरांचा मोठा प्रतिसाद, राजकीय नेत्यांकडून राज्यपाल व भाजपवर जोरदार हल्लाबोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि.13) ‘पुणे बंद’चे (Pune Band) आवाहन करण्यात आले होते. पुण्यातील डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) पुतळा ते लाल महाल पर्यंत (Lal Mahal) मुक मोर्चा (Muk Morcha) काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये (Pune Band) विविध राजकीय पक्ष, संघटनांनी सहभाग घेतला होता. या मोर्चाची सांगता दुपारी लाल महाल येथे झाली. यानंतर नेत्यांनी आपल्या भाषणातून राज्यपाल आणि भाजप नेत्यावर जोरदार हल्लाबोल केला.

 

भाजपच्या नेत्यांच्या खुर्च्या जनतेने हिसकावल्या पाहिजेत – सुषमा अंधारे
ज्या ज्या नेत्यांवर शाई फेकावीशी वाटते त्यांनी ती साठवावी. प्रत्येकाने ती शाई आपल्या बोटाला लावली पाहिजे आणि महापुरुषांचा अवमान करणारी विचारधारा पराभूत करण्यासाठी ती शाई बॅलेट पेपरमधून अत्यंत संविधानिक मार्गाने वापरली पाहिजे. भाजपच्या ज्या नेत्यांना महापुरुषांच्या सन्मानापेक्षा स्वत:ची खुर्ची महत्त्वाची वाटत आहे, त्यांच्या खुर्च्या जनतेने हिसकावल्या पाहिजेत असे सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी म्हटले.

खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhosale) लाल महालात आले होते. ते येथेही निषेध नोंदवायला येतील, मला त्यांच्यासमोर बोलायची संधी मिळेल. ‘कुछ हम सुनाऐंगे, कुछ ओ कहेंगे’ असे काहीतरी होईल असे वाटले. मात्र, ते उपस्थित राहिले नाहीत. कदाचित महापुरुषांचा झालेला अवमान त्यांना सहन झालेला नसेल आणि ते तडकाफडकी खासदारकीचा राजीनामा देण्यासाठी दिल्लीला गेले असतील असे आपण गृहीत धरू या. तसेच भविष्यात ते राजीनामा भिरकन भिरकावतील, असेही अंधारे म्हणाल्या.

वाचाळ विरांना जागा दाखवण्याची वेळ आली- प्रशांत जगताप
मागील चाळीस वर्षांच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करण्याची हिंमत देशात, जगात कोणाची झाली नव्हती. बहुजन समाजाच्या महान नेत्यांची कुचंबणा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे विविध पक्ष, संस्था, संघटना, तसेच पुणेकरांनी कडकडीत बंद पाळला. या बंदमध्ये कोण कोण नव्हते, कोणाचा मोर्चाला विरोध होता, हे पुणेकरांनी समजून घ्यावे. वाचाळ विचारांना आवर घालत त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी म्हटले.

तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही – दीपक मानकर
कोश्यारी नावाच्या बादशहालाही धास्ती पडली असून, त्याला आता महाराष्ट्रातून जावे लागणार आहे. केंद्राकडून चुकीच्या पद्धतीने नेत्यांची पाठराखण करत आहे. महापुरुषांबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय शिवप्रेमी शांत राहणार नाही. कोश्यारींची हकालपट्टी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे माजी उपमहापौर दीपक मानकर (Deepak Mankar) यांनी सांगितले.

 

परक्यांना ओळखून बाहेर काढा – अरविंद शिंदे
मागील पंधरा दिवसांपासून सर्वांना आवाहन करीत आहे. जे आले ते आले; पण जे आले नाहीत त्यांना लक्षात ठेवा. परक्यांतील आपली माणसे निवडायची आहेत, तसेच आपल्यातील परक्यांना ओळखून तांदळासारखे बाहेर काढायचे आहे. महापुरुषांचा अपमान आम्ही पुणेकर सहन करणार नाहीत. याचबरोबर शाईफेक प्रकरणातील पोलिसांवरील निलंबन मागे घ्यावे, असे काँग्रेस नेते अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी म्हटले.

 

तर त्यांना राज्यात हिंडू देणार नाही – रुपाली पाटील-ठोंबरे
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असूनही तिकिटांच्या आमिषाने भाजपचे लोक शांत आहेत.
नेत्यांची बेताल वक्तव्ये थांबली नाहीत, तर त्यांना राज्यात हिंडू देणार नाही.
आम्हाला तुरुंगात टाकायचे असेल तर टाका; पण महाराजांबद्दल एकही बेताल वक्तव्य आम्ही मावळे ऐकून घेणार नाहीत,
असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombre) यांनी दिला.

तुमच्या सत्तेवर आम्ही नांगर फिरवणार – संतोष शिंदे
केंद्रात आणि राज्यात सत्तेत बसलेल्या जातीयवादी, मनुवादी नेत्यांनी महापुरुषांच्या बदनामीची सुपारी घेतली आहे.
बेचिराख झालेल्या पुण्यात येथूनच जिजाऊंनी बालशिवाजींना सोबत घेत सोन्याचा नांगर फिरवला होता.
तुमच्या सत्तेवरही आम्ही नांगर फिरवणार आहोत.
वक्तव्ये थांबली नाहीत तर मंत्रालय आणि संसदेवर मोर्चा काढण्यात येईल,
असा इशारा संभाजी ब्रिगेडचे नेते (Sambhaji Brigade) संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी दिला.

या संघटनांनी घेतला सहभाग
या वेळी मराठा क्रांती मोर्चा, मराठा सेवा संघ, छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड संघटना, दलित संघ, शिवसंग्राम,
भीम आर्मी, बहुजन एकता, सह्याद्री सोशल फाउंडेशन, संभाजी ब्रिगेड, वक्फ बोर्ड बचाव ॲक्टिव्हिस्ट,
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया, लोकजनशक्ती पार्टी, जमात ए इस्लामी, युवक क्रांती दल,
मातंग एकता दल, सह्याद्री कुणबी संघ, स्वराज्य संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,
एआयएमआयएम, आम आदमी पक्ष, झोपडपट्टी सुरक्षा दल, समता परिषद आदी संघटनांनी सहभाग घेतला.

 

Web Title :- Pune Band | Big response of Pune people to ‘Pune Bandh’, strong attack on Governor and BJP by political leaders

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sushma Andhare On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना शिवरायांबद्दल द्वेष, आकस; पुण्यात सुषमा अंधारेंचा घणाघात

IND vs BAN Test | भारताचे ‘हे’ 3 खेळाडू रचू शकतात इतिहास; व्हाईस कॅप्टन चेतेश्वर पुजाराही समावेश

Urfi Javed | उर्फी जावेद पुन्हा एकदा अडकली कायद्याच्या कचाट्यात; ‘या’ व्यक्तीने दाखल केली तक्रार