Pune : शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

जंगली महाराज रस्त्यावर भाजपचे कार्यालय आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर भाजप शहर कार्यालयाच्या परिसरातील बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे डेक्कन पोलिसांनी सांगितले. तर याबाबत भाजपच्या शहर पदाााधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी बंदोबस्त लावण्याबाबतचे कारण सांगितले नाही.

पोलिसांनी मात्र कार्यालयाच्या परिसरात नियमित बंदोबस्त लावण्यात येतो, असे सांगितले. दरम्यान, शहर कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त वाढविण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार सोमवारी मध्यरात्रीपासून कार्यालयाच्या परिसरात बंदोबस्त तैनात केले आहेत.