Pune Bangalore Expressway | पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटीचा होणार नवा महामार्ग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विकेंद्रीकरणातूनच पुण्यातील कोंडी आणि गजबजाट दूर होऊ शकतो. त्यासाठी फलटणमार्गे पुणे-बेंगळुरू दरम्यान ४० हजार कोटी रुपये खर्च करून नवा महामार्ग (Pune Bangalore Expressway) विकसित केला जाणार आहे. अशी घोषणा करत या महामार्गालगत (Pune Bangalore Expressway) नवीन पुणे वसवणे शक्य होईल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला. या नव्या पुण्याला सुसज्य रस्ते आणि मेट्रोद्वारे जोडणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राजाराम पूल ते ‘फन टाइम थिएटर’पर्यंत बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे (rajaram bridge to fun time multiplex flyover) भूमिपूजन शुक्रवारी नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (dr neelam gorhe), खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat), आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil), माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal), भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), मुक्ता टिळक (MLA Mukta Tilak), महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार (pmc commissioner vikram kumar) उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, पुण्यातील प्रलंबित असलेल्या मेट्रो, चांदणी चौक उड्डाणपूल आणि विमानतळाचे विस्तारीकरणसारख्या प्रकल्पांना गती देऊ शकलो याचे समाधान वाटते. पुणेच नव्हे तर राज्यातील विविध प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. तळेगाव, वाघोली व शिरूर दरम्यान बहुमजली पूल उभारण्याचा पुनरुच्चार करतानाच पुण्यालगतचा नगर, सोलापूर, सातारा, कोल्हापूर हा परिसर कमी खर्चांत ‘ब्रॉडगेज मेट्रो’ द्वारे जोडण्याची संकल्पना त्यांनी पुन्हा (Pune Bangalore Expressway) मांडली. दरम्यान, पुण्यातील प्रदूषण वाढत आहे. ते कमी करण्यासाठी आता वेगाने पावले उचलायला हवी असेही त्यांनी सांगितले.

नितीन गडकरी यांनी दिल्ली-मुंबई महामार्ग (Delhi Mumbai Expressway) कामाची माहितीही यावेळी दिली.
ते म्हणाले, दिल्ली-मुंबई महामार्गाचे महाराष्ट्रातील काम सुरु व्हायचे आहे. नरिमन पॉइंटजवळ हा महामार्ग संपेल.
तेथून बारा तासांत दिल्लीला जाता येईल. माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या जवळचा वांद्रे-वरळी सागरी सेतू वसई-विरार पर्यंत वाढवता येईल असेही ते म्हणाले.

अजित पवार म्हणाले, ठेकेदार आणि पालिकेने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता कमी त्रास होईल
अशा पद्धतीने विकासकामे वेळेत पूर्ण करावीत. पूर्वी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध व्हायचा.
मात्र आता जमिनीच्या किमती वाढल्याने स्वतःहूनच लोक दादा आमच्या शेतातून रस्ता न्या, अशी मागणी करू लागले,
असे पवार यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

गिरीश बापट म्हणाले, शहरात मोठ्या प्रमाणात फलक लावले जात आहे.
त्यांच्याकडूनच विकासकामांसाठी काही लाख रुपये घेतले पाहिजे.
म्हणजे फलक उडाले तरी विकासकामांमुळे नाव कायम राहील,असा टोला नगरसेवकांना लगावला.

Web Titel :- Pune Bangalore Expressway | nitin gadkari announces new pune bangalore highway in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ओळख कशाला करुन देतो, असे म्हटल्याने टोळक्याने मारहाण करुन केली तोडफोड; वारजे माळवाडीमधील घटना

Maharashtra Cinema Hall Reopen | राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार

DGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, 4 डीसीपी, काही एसीपींसह 25 पोलिस अधिकारी ‘गोत्यात’, निलंबनाच्या हालचालींना वेग; जाणून घ्या प्रकरण