Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; तिंघाचा मृत्यू तर एकजण जखमी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune-Bangalore Highway Accident | पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात (Pune-Bangalore Highway Accident) झाल्याची घटना घडली आहे. या महामार्गावरील किणी टोल नाकाजवळ (Kini Toll Naka) उभ्या असलेल्या कंटेनरला मोटारीची धडक बसल्यानंतर अपघातग्रस्त मोटारीला मागून एका ट्रकने धडक दिली. या दुर्घटनेत बंगळुरू येथील तिघांचा मृत्यू (Died) झाला आहे. तर एक महिला जखमी (Injured) असल्याची माहिती आहे.

 

निलेश कुमार सी (Nilesh Kumar c) (वय 42), संजना माहेश्वरी (Sanjana Maheshwari) (वय 27) जिथ्या त्रिलेश (Jithya Trilesh) (वय 11, रा. सर्व मीनाक्षीनगर बेंगलोर) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात अरींनी एन. (Arinni n) (वय 41, रा. बेंगलोर) या जखमी झाल्या आहेत. (Pune-Bangalore Highway Accident)

 

याबाबत माहिती अशी की, निलेश कुमार सी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या महिंद्रा मोटारीतून बंगळुरूकडे निघाल्या होत्या. काल रात्री 12.15 वाजता ते किणी टोल नाक्यापासून पुढे आले. तेथून काही अंतरावर 1 कंटेनर उभा होता. त्याच्या मागील बाजूस रिफ्लेक्टर, बॅरॅकेटेड याची व्यवस्था केलेली नव्हती. राष्ट्रीय महामार्गावरील वारणा नदीवरील पुलाच्या उतारावर वळणावर हा कंटेनर उभा केला होता. मोटार चालकास रात्री तो नीट दिसला नाही. मोटार कंटेनरला पाठीमागून धडकून अपघात झाला. तर मोटारीस मागून आलेल्या ट्रक चालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगाने वाहन चालवून जोरात धडक दिली आहे.

दरम्यान, या अपघातानंतर ट्रक व कंटेनर वरील चालक जखमींना मदत न करता पसार झाले. याबाबत धोंडीराम जयसिंग वड्ड (Dhondiram Jaisingh Wadd) (वय 39 रा. वडवाडी) यांनी शनिवारी सकाळी फिर्याद दाखल केली आहे. यावरुन वडगाव पोलीस ठाण्यात (Wadgaon Police Station) गुन्हा दाखल झाला आहे.

 

Web Title :- Pune-Bangalore Highway Accident | pune bangalore national highway accident three killed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jyotiraditya Scindia | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले – ‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे…’

 

Pune Crime | भर रस्त्यात महिलेने स्वत:चा टॉप फाडून केली महिला पोलिसांना मारहाण; वडगावशेरी परिसरातील घटना

 

Dia Mirza Traditional Look | दिया मिर्झाच्या पारंपारिक लूकनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके, पाहा व्हायरल फोटो…

 

Pune News | दृष्टीबाधित व्यक्तींच्या मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; ‘द पूना ब्लाईंड मेन्स असोसिएशन’ व ‘सेवा सहयोग संस्थे’चा उपक्रम