Pune-Bangalore Highway | पुणे-बेंगलोर महामार्गावर 3 फूट पाणी, महामार्ग अद्यापही बंदच; 40 तासापासून वाहतूक खोळंबली

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुसळधार पावसाचा (Heavy rain) तडाखा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे-बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) कोल्हापूरपर्यंतची वाहतूक आजही (रविवार) बंद आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर (Pune-Bangalore highway) शुक्रवार पासून पुराचे (kolhapur flood) पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अद्यापही Pune-Bangalore Highway मार्गावर तीन फूट पाणी असल्याने वाहतूक बंद आहे. पुराचे पाणी कमी होण्याची गती खूपच संथ आहे. त्यामुळे आज दिवसभर आणि रात्री पावसाने विश्रांती घेतली तर उद्या सोमवार (दि.26) सकाळ पर्यंत वाहतूक सुरु होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने (District Administration) व्यक्त केली आहे.

महामार्गावर 4 ठिकाणी पाणी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चार ठिकणी पाणी आले आहे. यातील कराडजवळ (Karad) मांडनीचे पाणी मालखेड गावाजवळ रस्त्यावर आले आहे. शनिवारी सकाळी पाणी ओसरले. परंतु सांगली (Sangli) जिल्ह्यातील कणेगावजवळ, पुढे कोल्हापूरजवळ (Kolhapur) पुलाची शिरोलीजवळ, कागलवेशीवर आणि पुढे कर्नाटकातील (Karnataka) यमगर्णी रस्त्यावर आजही पुराचे पाणी आहे.

40 तासापासून वाहतूक ठप्प

वारणा आणि पंचगंगा नदी (Panchganga river) धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. या नद्यांचे पाणी संथ गतीने कमी होत आहे. पंचगंगा नदीचे पाणी शनिवारी सायंकाळी तीन फुटांपर्यंत कमी झाले होते. त्यामुळे आज (रविवार) महामार्ग सुरु होईल असे वाटले होते. परंतु पाणी कमी न झाल्याने आजही हा महामार्ग वातूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. महामार्ग बंद झाल्याने वाहने पुणे, सातारा, कराड येथे थांबली आहेत. या वाहन चालकांना सोमवार पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा महामार्ग शुक्रवार (दि.23) सायंकाळी पाच वाजल्यापासून बंद असून 40 तास उलटले तरी वाहतूक सुरु झालेली नाही.

हे देखील वाचा

Ration Card | खुशखबर ! रेशन कार्डधारकांना नोव्हेंबरपर्यंत फ्री ‘रेशन’शिवाय मिळतील अनेक मोठे फायदे, जाणून घ्या

Pimpri Crime | सफाई कामगारांचे पूर्ण वेतन न देणाऱ्या कंपनीच्या संचालकासह 15 जणांवर FIR, 7 जणांना अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune-Bangalore Highway | kolhapur flood three feet water road pune bangalore highway still closed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update