Pune-Bangalore Highway | शुक्रवारपासून बंद असलेली पुणे-बंगळूर महामार्गावरील वाहतूक आज सुरु होण्याची शक्यता

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे – बंगळूर महामार्गावरील (Pune-Bangalore Highway) पाणी (Water) ओसरण्यास सुरुवात झाली असून आज दुपारपर्यंत या महामार्गावरील वाहतूक (HighwayTraffic) सुरु होण्याची शक्यता आहे. तावडे हॉटेले ते सांगली फाटा (Tawde Hotel to Sangli Fata Flood) या दरम्यानच्या महामार्गावर (Pune-Bangalore Highway) अजूनही दीड फुट पाण्याची पातळी आहे. महामार्गावर पाणी आल्याने गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण वाहतूक ठप्प आहे.

शुक्रवारी रात्री महामार्गावर पुराचे (Flood) पाणी आल्याने सर्व प्रथम पुण्याकडे जाणारा रस्ता बंद करुन एकाच रस्त्यावरुन दुहेरी वाहतूक (Double Traffic) सुरु करण्यात आली होती. पण काही वेळात पाण्याची पातळी वाढल्याने सर्व वाहतूक बंद (Pune-Bangalore Highway Traffic Closure) करण्यात आली होती. रविवारी दुपारी जेसीबी पाठवून पाण्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण पाण्याच्या मध्यावर गेल्यानंतर पाण्याचा प्रचंड वेग असल्यामुळे जेसीबीही परत माघारी घ्यावा लागला.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे (Superintendent of Police Shailesh Balkwade) यांनी आज सकाळी पाण्याची पाहणी केली. पंचगंगेची (Panchganga) पाण्याची पातळी ४९ फुटापर्यंत आली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगेची पाणी पातळी खाली येत आहे.
सोमवारी सकाळी पुन्हा पाण्याचा अंदाज घेण्यात येणार असून त्यानंतर रस्त्यावरुन अत्यावश्यक वाहने सोडण्यात येतील,
असे शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे (Shiroli MIDC Police Thane) सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले (Assistant Inspector Kiran Bhosale) यांनी सांगितले.

Web Title :  Traffic on Pune-Bangalore highway is likely to start today

 

Pune News | भाजपच्या महिला नगरसेविकांना ‘एकाधिकारशाही’चा असाही फटका !
महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, पीएमपी संचालक पदाच्या दावेदार ‘तापकीर’ यांची
‘पक्ष उपाध्यक्ष ‘ पदावर ‘बोळवण’

Coronavirus | कोरोनापासून बचाव करायचा आहे का?
शरीरात होऊ देऊ नका ‘या’ 4 व्हिटॅमिनची कमतरता

Monsoon Tips | पावसाळ्यात घरात ओलावा येतो का? उपयोगी पडतील ‘या’ सोप्या टिप्स; जाणून घ्या