Pune : कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पॅकिंगसाठी बँग, PPE कीट आणि पास मोफत देऊ – चंद्रकांत मोरे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पॅकिंगसाठी बँग आणि पॅकिंग करणाऱ्या व्यक्तीला पीपीई कीट महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. तसेच मृत्यूचा दाखलासुद्धा तेथेच मिळणार आहे. ऑनलाइन पद्धतीने मृत्यू दाखल्यासाठी पुणे कॉरपोरेशनडॉटओरजी या संकेत स्थळावर माहिती भरून लगेच मृत्यू पास मिळू शकतो. त्यासाठी काही मदत हवी असल्यास 8087843131 या क्रमांकावर संपर्क साधा, असे शेतकरी नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी सांगितले.

मोरे म्हणाले की, कोरोना आजाराने संक्रमित असतील, त्यांच्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून नागरिक शेतकरी संघ सामाजिक कार्य करत आहेत. कोरोनाने मृत्यू व्यक्तीसाठी पॅकिंग बॅग, पॅकिंग करणाऱ्यासाठी पीपीई कीट आणि मृत्यू दाखला अशी सेवा पालिकेच्या वतीने सुरू केली आहे. कोणाला अडचण असेल, तर त्यांनी 8087843131 या मोबाईल क्रमांकवर संपर्क साधला किंवा मेसेज केला तरी पुणे महापालिकेच्या वतीने असणार्‍या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. मृत्यू पास, पीपीई कीट, मृ्त व्यक्तीला पँकिग बँग स्वतः आणून देऊ, ही सेवा 24 बाय 7 असणार आहे, असे त्यांनी सांगितले.