Pune Bar Association Elections | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. केतन कोठावळे तर उपाध्यक्षपदी  अ‍ॅड. विश्वजीत पाटील आणि अ‍ॅड. जयश्री चौधरी – बीडकर विजयी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Bar Association Elections | पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे हे अध्यक्षपदी बहुमताने निवडून आले. शिवाजीनगर न्यायालयात (Shivaji Nagar Court, Pune) सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती. (Pune Bar Association Elections)

 

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अ‍ॅड. केतन कोठावळे यांनी अ‍ॅड. राहुल दिंडोकर यांचा १ हजार २३० मतांनी पराभव केला. कोठावळे यांना २ हजार ७२८ मते मिळाली.

 

उपाध्यक्षपदाच्या लढतीत अ‍ॅड. विश्वजीत पाटील यांना ३ हजार १० तर, अ‍ॅड. जयश्री चौधरी -बीडकर यांना २ हजार २३४ मते मिळून ते विजयी झाले. अ‍ॅड. राहुल कदम यांना २ हजार ७१९ व अ‍ॅड. गंधर्व कवडे हे २ हजार ४९१ मते मिळवून सचिवपदी विजयी झाले. खनिजदारपदाच्या लढतीत अ‍ॅड. समीर बेलदरे यांनी २ हजार ७९१ मते मिळवत विजय मिळविला. अ‍ॅड. अजय देवकर यांची  ऑडिटर म्हणून निवड झाली आहे. (Pune Bar Association Elections)

बार असोसिएशनच्या कार्यकारिणी सदस्यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली होती. त्यात अमोल वडगणे, प्रमोद नढे, मयुरी कासट, संजय खैरे, रेश्मा चौधरी, श्रद्धा जगताप, राहुल प्रभुणे, ऋषिकेश कोळपकर, चंद्रसेन कुमकर, सचिन माने अशी कार्यकारिणी सदस्यांची नावे आहेत.

 

अ‍ॅड. अमित गिरमे यांनी मुख्य निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहिले.
त्यांना अ‍ॅड. दिलीप जगताप, अ‍ॅड. माधवी पोतदार, अ‍ॅड. शरद कुलकर्णी,
अ‍ॅड. कांताराम नप्ते आणि अ‍ॅड. सिद्धेश्वर चौधरी यांनी उपनिवडणुक अधिकारी म्हणून मदत केली.

 

Web Title :- Pune Bar Association Elections | Pune Bar Association President
Adv. Ketan Kothavle as Vice President Adv. Vishwajit Patil and Adv. Jayshree Chaudhary – Beedkar won

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा