पुणे बार असोसिएशन मराठा कार्यकर्त्यांवरील केसेस मोफत लढणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यात सध्या सकल मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे जिल्हा बार असोसिएशनने पाठींबा दिला आहे. आंदोलन काळात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या केसेस बार असोसिएशनकडून मोफत लढविल्या जाणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. सुभाष पवार यांनी दिली.
[amazon_link asins=’B01LXHKR4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6f721663-90dd-11e8-9e14-7958352837dd’]

सकल मराठा समाजाने पुकारलेले राजव्यापी आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा बार असोसिएशननेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आंदोलनास पाठींबा देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. या आंदोलनात मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर दाखल असलेल्या केसेस मोफत लढल्या जाणार आहेत.

ज्या आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखला आहेत. त्या आंदोलनकर्त्यांनी याबाबतची माहिती पुणे जिल्हा बार असोसिएशनला द्यावी, असे आवाहन ऍड. पवार यांनी यावेळी केले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी विनंती असोसिएशनकडून करण्यात आली आहे.