एकाच वेळी ‘सेक्स रॅकेट’, ‘मटका’ जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश, ग्रामीण पोलिसांच्या बारामतीच्या गुन्हे शाखेची भिगवणमध्ये कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बारामती गुन्हे शाखेची भिगवणमध्ये दणकेबाज कारवाई करत एकाच वेळी वेश्या व्यवसाय आणि मटका जुगार आड्यावर छापे मारले आहेत. यामुळे ग्रामीण पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईत 8 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे.

भिगवण येथे अवैध ऑनलाइन मटका व कल्याण मटका तसेच वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती बारामती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभागाचे जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व पथकातील सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारी करत ऑनलाइन मटका, कल्याण मटका आणि वेश्या व्यवसायवर छापे टाकले. या कारवाईत 1 लाखा 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केेला आहे.

तर 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल त्यांना पकडले आहे. तसेच वेश्याव्यवसाययातून पश्चिम बंगाल येथील दोन मुलींची सुटका करण्यात आली. वेश्या व्यवसाय सत्यजित हॉटेल मदनवाडी भिगवण येथे सुरू होता. हे हॉटेल प्रभाकर शेट्टी याने चालविण्यास घेतले होते. तर मॅनेजर मनोज मोहिते याला पकडले आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like